सणांचे समाज जीवनातील स्थान (Place of Festivals in Social Life)
सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाल्यापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीही कोणताही सण साजरा न करणारा समाज जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण …