मुहर्रम – धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

मागील काही वर्षांपासून मुहर्रम संदर्भात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर बांधवांमध्ये उत्सुकता वाढत आहे. सोशल मीडियावर, विशेषतः Twitter, Instagram आणि Facebook सारख्या माध्यमांवर #मुहर्रम ट्रेंड करताना दिसतो आहे. अनेकजण मुहर्रम म्हणजे काय, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि धार्मिक महत्त्व काय, याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी आपापल्या परीने माहिती संकलित करून ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला …

पुढे वाचा

मांसाहारावरील आक्षेपांची उत्तरे ( Answers to the Objections to Non-Vegetariasm)

या प्रकरणात मांसाहारावरील आक्षेपांची चर्चा करूयात. मांसाहाराबद्दल चर्चा करताना मांसाहारावर घेतले जाणारे आक्षेप काय आणि कोणत्या प्रकारचे आहेत, हे जाणून घेणे जास्त फायद्याचे ठरेल. शाकाहारींतर्फे मांसाहारासंदर्भात घेतला जाणारा एक आक्षेप असा आहे की, मांसाहार विकृती आहे, हिंस्र स्वभाव आहे. मात्र मानवी इतिहासाचा अगदी सामन्यातला सामान्य विद्यार्थीदेखील हे सांगू शकतो की हा आक्षेप अतिशय हास्यास्पद आहे. …

पुढे वाचा

मांसाहार आणि मांसाचा व्यापार (Non-vegetarianism & The Non-vegetarian Industry)

प्राणी मानवाची केवळ अन्न गरज नव्हे तर इतर अनेक गरजांची पूर्तता करतात. जसे जिवंत प्राण्यांपासून अनेक लाभ प्राप्त होतात, तसे मृत प्राणीदेखील लाभदायक सिद्ध होतात. मृत जनावरांपासून मनुष्य मासांव्यतिरिक्त कातडे व चरबी प्राप्त करतो. बाजारात उपलब्ध Cod Liver Oil माशाच्या चरबीपासून बनते. रेशीमच्या प्राप्तीसाठी रेशमी किड्यांना त्यांच्या Pupa या अवस्थेत गरम पाण्यात उकळून ठार मारले …

पुढे वाचा

शाकाहारी विचाराची चिकित्सा (Reviewing The Idea of Vegetarianism)

मांसाहाराला होणारा विरोध अहिंसेच्या अतिरेकामुळे केला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने तर्कसंगत चर्चा करून आपला मुद्दा मांडणारे खूपच कमी असतात. कारण तर्कसुसंगत चर्चा करताना मांसाहार सर्वथा वर्ज्यच करावा लागेल, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. तर्कशुद्ध चर्चा करताना जास्तीत जास्त इतके म्हणले जाऊ शकते की, मासांहाराच्या अतिरेकाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आहाराचा संतुलित वापर असेल तर विपरीत …

पुढे वाचा

इस्लाम आणि मानवी जीवनाचा उद्देश (Islam & the Purpose of Human Life)

Islam Aani Manvi Jivanacha Uddesh

मानवजात आणि एकता मानव समाजप्रिय प्राणी आहे. विकसीत मानवी समाजासाठी सामाजिक एकता अनिवार्य आहे. एकतेशिवाय मानवी समाजाचा विकास होणे शक्य नाही. समस्त मानवजातीच्या मुलभूत गरजा सारख्याच आहेत. सर्व माणसे एकाच प्रकारे जन्माला येतात, एकाच प्रकारे आपल्या मुलभूत गरजा पुर्ण करतात आणि एकाच प्रकारे त्यांचा अंत होतो. निसर्गाचा हाच नियम आहे. मानवी समाजात इतकी कमालीची नैसर्गीक …

पुढे वाचा

अस्पृश्यता आणि इस्लाम (Untouchability and Islam)

अस्पृश्यता आणि इस्लाम अस्पृश्यता मानवी समाजास पोखरून काढणारी किड आहे. समाजास जडलेला एक रोग आहे. ज्या समाजाला हा रोग होतो, तो समाज इतिहासाच्या पानावर आपला कलंकित चेहरा मागे ठेवून जातो. उच्च मानवी मुल्यांचा, नैतिकतेचा पाया अस्पृश्यता पोखरुन टाकते; समाजाला विस्मयकारकपणे रानटी, क्रूर आणि असभ्य बनवते. जेथे मानवच मानवाचा शत्रु बनतो. तो त्यांची विभागणी विविध वर्गात …

पुढे वाचा

प्रेषित मुहम्मद कसे होते? (How Was Prophet Muhammad (PBUH))

muhammad saw kasa hote

“मी प्रेषितांकडे पाहिले आणि चंद्राकडे पाहिले, प्रेषितांनी लाल आच्छादन घेतले होते आणि ते मला चंद्रापेक्षा जास्त सुंदर दिसत होते.” [अल-तिर्मिजी] जाबीर इब्न समुराने अशाप्रकारे इस्लाम धर्माच्या प्रेषितांचे, आस्तिकांची प्रेरणा, जगासाठी कृपा म्हणून अल्लाहतर्फे निवडण्यात आलेल्या अंतिम प्रेषितांचे, मुहम्मद [स.] यांचे या शब्दांत वर्णन केले आहे. त्यांचा चेहरा गोलाकार, शुभ्र, तेजस्वी आणि आनंददायी होता. त्यांचे केस …

पुढे वाचा

प्रस्तावना प्रेषित मुहम्मद स (Introduction Of Prophet Muhammad PBUH)

प्रेषित मुहम्मद [स.]

धर्मयुद्धाच्या आरंभासह, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या विरुद्ध सर्वप्रकारच्या अपप्रचाराला सुरुवात झाली. मैदानावर शस्त्रांची आणि मैदानाच्या बाहेर निराधार पूर्वग्रह दुषित अपप्रचाराची लढाई क्रुसेड समर्थकांकडून लढली गेली. इस्लामबद्दल व्यक्त होणाऱ्या पाश्चात्य विद्वान आणि विचारवंतांवर क्रुसेड विचारांचा प्रभाव होता. या पाश्चात्य विचारवंतांच्या प्रभावातील भारतीय  लेखकांच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. मात्र पाश्चात्यांच्या बाबतीत समाधानकारक बाब म्हणजे आधुनिक युगात …

पुढे वाचा

मांसाहार आणि विवेकानंद (Swami Vivekananda and Non Veg)

vivekananda

देशातील उजव्या विचारसरणीसाठी विवेकानंद अत्यंत महत्वाचे आहेत. वैष्णव बांधवांबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “त्यांचे देव राम वा कृष्ण मद्यमांस झक्क उडवीत असत – रामायण-महाभारतात पुरावे आहेत! सीतादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता.”[1] मांसाहार समर्थक आणि शाकाहार समर्थकांच्या वादाचा उल्लेख करून विवेकानंद दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मांडतात आणि शेवटी म्हणतात, “कुणी …

पुढे वाचा

मांसाहार धार्मिक दृष्टीकोनातून (Non-Vegetarianism From a Religious Perspective)

मांसाहार धार्मिक दृष्टीकोनातून

आता आपण मांसाहाराबद्दल चर्चा करूयात. अनेकांचा असा गैरसमज आहे की, मुस्लिमांच्या मांसाहारामागे धार्मिक प्रेरणा कार्यरत असते. या प्रकरणात आपण मांसाहाराबद्दलचा सर्वधर्मिय दृष्टीकोन काय आहे, हे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी शाकाहार आणि मांसाहाराची व्याख्या काय, हे पाहूयात. मांसाहार म्हणजे फक्त आणि फक्त मांसाचा आहार असे नाही. मांसाहाराची अशी व्याख्या कोणत्याही शब्दकोशात सापडत नाही. मांसाहाराची व्याख्या केवळ …

पुढे वाचा