मांसाहार धार्मिक दृष्टीकोनातून (Non-Vegetarianism From a Religious Perspective)

मांसाहार धार्मिक दृष्टीकोनातून

आता आपण मांसाहाराबद्दल चर्चा करूयात. अनेकांचा असा गैरसमज आहे की, मुस्लिमांच्या मांसाहारामागे धार्मिक प्रेरणा कार्यरत असते. या प्रकरणात आपण मांसाहाराबद्दलचा सर्वधर्मिय दृष्टीकोन काय आहे, हे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी शाकाहार आणि मांसाहाराची व्याख्या काय, हे पाहूयात. मांसाहार म्हणजे फक्त आणि फक्त मांसाचा आहार असे नाही. मांसाहाराची अशी व्याख्या कोणत्याही शब्दकोशात सापडत नाही. मांसाहाराची व्याख्या केवळ …

पुढे वाचा

कुरआनातील आयतींचा संदर्भ [Reference to verses in the Qur’an]

surah hajj 37

आपल्या हेतूंच्या समर्थनार्थ कुरआनच्या आयतींना त्यांच्या मूळ संदर्भापासून वेगळे करून त्यांचा आपल्याला हवा तसा सोयीस्कर अन्वयार्थ करण्याचा प्रयत्न जगभर अनेकदा करण्यात आला आहे. असे प्रयत्न जवळजवळ प्रत्येक धर्मसंहितेबद्दल होतच असतात. जगभरातील दहशतवादी संघटना त्यांच्या दुष्कृत्याच्या समर्थनार्थ धर्मग्रंथांचा संदर्भ देत असतात. दुसरीकडे जगातील बहुसंख्य धर्मविद्वान आणि अभ्यासक त्यांच्या या मांडणीचे खंडन करीत असतात. तसेच जगातील बहुसंख्य …

पुढे वाचा

कुर्बानी – तत्वज्ञान आणि उद्देश [Qurbani – Philosophy and Purpose]

khurbani ek upasna

मानवाच्या आपल्या पालनकर्त्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, धर्माने ठरवून दिलेल्या पद्धती म्हणजे उपासना होय. इस्लाममध्ये अनुयायांसाठी काही उपासना पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. अर्थात त्यांचे निर्धारण अल्लाहतर्फे केले गेले आहे. त्या उपासना पद्धती कोणत्या? नमाज, रोजा, जकात आणि हज या चार उपासना अल्लाहतर्फे निर्धारित करण्यात आल्या आहेत. या उपासनांमागे काही उद्देश आहेत. उपासना कधीच उद्देशहीन …

पुढे वाचा

कुर्बानीची पार्श्वभूमी (Background of Qurbani)

कुर्बानीची पार्श्वभूमी

कुर्बानीची चर्चा करण्यापूर्वी प्रथम आपण तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊयात. कुर्बानी प्रेषित इब्राहीम [अलै.][1] यांच्या काळापासून अखंडित चालू असलेली परंपरा आहे. प्रेषित मुहम्मद [स.] कुर्बानीचे जनक नाहीत, तर वाहक आहेत. त्यांनी कुर्बानीला अनिष्ट रूढीपासून मुक्त करून तिच्या मूळ स्वरुपात पुनरुज्जीवित केले आहे. कुर्बानीचा इतिहास प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळापासूनचा आहे. या प्रकरणात आपण तो इतिहास …

पुढे वाचा

इस्लामी सणांचे स्वरूप (Nature of Islamic Festivals)

islamic festivals

इस्लामने मुस्लिमांसाठी केवळ दोनच धार्मिक सण निर्धारित केले आहेत. ‘ईद उल फित्र’ आणि ‘ईद उल अझहा’. भारतीय उपखंडात ईद उल फित्र ‘रमजान ईद’ तर ईद उल अझहा ‘बकरी ईद’ या नावाने ओळखली जाते. हे दोन्ही सण वैश्विक मुस्लिम समाजातर्फे जगभरात साजरे केले जातात. कोट्यवधी मुस्लिम एकाच दिवशी एकाच प्रकारे हे सण जगभरात साजरे करतात. ‘ईद’ …

पुढे वाचा

सणांचे समाज जीवनातील स्थान (Place of Festivals in Social Life)

social festival

सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाल्यापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीही कोणताही सण साजरा न करणारा समाज जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण …

पुढे वाचा