मांसाहार आणि विवेकानंद (Swami Vivekananda and Non Veg)
देशातील उजव्या विचारसरणीसाठी विवेकानंद अत्यंत महत्वाचे आहेत. वैष्णव बांधवांबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “त्यांचे देव राम वा कृष्ण मद्यमांस झक्क उडवीत असत – रामायण-महाभारतात पुरावे आहेत! सीतादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता.”[1] मांसाहार समर्थक आणि शाकाहार समर्थकांच्या वादाचा उल्लेख करून विवेकानंद दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मांडतात आणि शेवटी म्हणतात, “कुणी …