मांसाहारावरील आक्षेपांची उत्तरे ( Answers to the Objections to Non-Vegetariasm)
या प्रकरणात मांसाहारावरील आक्षेपांची चर्चा करूयात. मांसाहाराबद्दल चर्चा करताना मांसाहारावर घेतले जाणारे आक्षेप काय आणि कोणत्या प्रकारचे आहेत, हे जाणून घेणे जास्त फायद्याचे ठरेल. शाकाहारींतर्फे मांसाहारासंदर्भात घेतला जाणारा एक आक्षेप असा आहे की, मांसाहार विकृती आहे, हिंस्र स्वभाव आहे. मात्र मानवी इतिहासाचा अगदी सामन्यातला सामान्य विद्यार्थीदेखील हे सांगू शकतो की हा आक्षेप अतिशय हास्यास्पद आहे. …