प्रेषितवाद(रिसालत) (Prophethood)

इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की,जेंव्हा जेंव्हा या पृथ्वीतलावर बिघाड निर्माण झाला,लोकं आपल्या निर्मात्या ऐवजी इतर‍ांची उपासना भक्ती करु लागले,माणूस जेंव्हा स्वैराच‍ारी बनला,लोकं ईश्वराने आखून दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा अवलंब करु लागले.अशावेळी लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी,मणुष्याला ईश्वर अल्लाहच्या कृपाप्रसादांचा बोध व्हावा यासाठी,पृथ्वीतलावरील बिघाड नष्ट करण्यासाठी,मणुष्याचा स्वैराचार संपून त्याने ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करावं यासाठी जगाच्या स्वामी अल्लाहने वेळोवेळी जवळपास सव्वा लाख पैगंबर, प्रेषित भूतलावर पाठविले. याच शृंखलेची शेवटची कडी प्रेषित मुहम्मद (स.) होत.
प्रत्येक मुसलमान ही ग्वाही देतो की, नाही कोणी पुजेच्या लायक शिवाय अल्लाहच्या आणि पैगंबर मुहम्मद(स.) हे अल्लाहचे बंदे दास आणि प्रेषित आहेत.मुहम्मदचा अर्थ ज्याची अतिशय स्तुती केली जाते असा आहे.इस्लाम धर्मियांची अशी श्रद्धा आहे की या पृथ्वीतलावर असे पुरुषोत्तम कधी झाले नाही आणि भविष्यात देखील होणार नाही.जेव्हा अरबस्थानाच्या वाळवंटात मुहम्मद (स.) यांचे शुभागमन झाले तेंव्हा या वाळवंटात एक जीवन जगण्याची नवी शैली निर्माण झाली.एक नवीन संस्कृती उदयास आली.एक अशा नवीन राज्याची स्थापना केली गेली ज्याचा प्रभाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला.
प्रेषित मुहम्मद (स.) ज्या अरबांमध्ये मक्केत इस्लामचा संदेश घेऊन आले होते ते लोकं इतके भयंकर होते की,त्यांच्यावर कोणी राज्य करायला देखील तयार होत नसत.त्यांच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर ते तिला जन्मतःच जीवंत दफन करायचे इतका पराकोटीचा स्रीद्वेष त्यांच्या मनामध्ये होता.वर्षानुवर्ष ते एक दुसर्‍याशी फक्त याच किरकोळ कारणामुळे भांडण करायचे की, तुझ्या उंटाने माझ्या उंटाच्या आगोदर पाणी का पिले?त्या लोकांमध्ये माणूसकीचा लवलेशही नव्हता परंतु पैगंबर मुहम्मद( स.) यांच्या अथक आणि खडतर मेहनती नंतर त्यांच्या अनुयायांनी इस्लामच्या संदेशाचा आणि निमंत्रणाचा स्विकार केला आणि ते कबील्यांचे सरदार बनले.त्यांचे जीवन कयामत म्हणजे महाप्रलया पर्यंत येणाऱ्या लोकांसाठी आदर्श बनले आहे.
उर्दू कवी मौलाना अल्ताफ़ हुसैन हाली म्हणतात
वो बिजली का कडका था या सौते हादी
अरबकी जमीं जिसने सारी हिलादी
एक नयी लगन सबके दिलमे लगादी
एक आवाजमे सोती बस्ती जगादी
माणूसकी हरवलेल्या समाजाला सन्मार्गावर आणन्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे योगदान अतुलनीय आहे.
दुर्दैवाने सांगावेसे वाटते की, मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खायला अजूनही लोकं जराही संकोच बाळगत नाही.माणूसकी हरवलेल्या या काळात माणूस पेश‍ाने डॉक्टर,इंजिनिअर,वकील,
शिक्षक बनला परंतु त्यांच्यात माणूसकी येण्यासाठी पैगंबरांच्या शिकवणूकीवर आचरण करण्याची नितांत आवश्यकता आहे.
पवित्र ग्रंथ कुराण मध्ये सृष्टिचा निर्माणकर्ता ईश्वर अल्लाह सांगतो की,हे प्रेषित मुहम्मद (स.) आम्ही तुम्हाला संपूर्ण विश्वासाठी कृपावंत बनवून पाठविले आहे.येथे एका गोष्टिकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो की कुराण सांगतो की, पैगंबर हे अखील मानवजाती साठी कृपावंत आहेत.येथे असं म्हटलेलं नाही की कृपावंत आहेत फक्त मुसलमानांसाठी किंवा अरबांसाठी.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर म्हणजे अगदी प्रात:र्विधी पासून ते शासन कसे करावे इथपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेषित मुहम्मद (स.)यांचे जीवनचरित्र हदिसच्या माध्यमातून मार्गदर्शक आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांची एक हदीस आहे की ती व्यक्ती आमच्यापैकी नाही.म्हणजे ती व्यक्ती मुसलमानच नाही,जी स्वत: भरपेट जेवण करत असेल आणि त्याचा शेजारी तसाच उपाशी पोटी झोपत असेल.येथे फक्त शेजारी हा शेजारी आहे तो कोणत्या जातीचा जमातीचा आहे याचा अजीबात उल्लेख नाही.ही माणूसकीची आणि गरजवंताला मदत करण्याची शिकवण पैगंबरांच्या जीवनचरित्रातून मिळते.
कष्टकर्‍यांबाबत सांगीतले आहे की मजुराच्या कामाचा मोबदला त्याचे घाम वाळण्यापुर्वी अदा करा.
आजपासून साडे चौदाशे वर्षापुर्वी मुलींना जन्मतःच जीवंत दफन करण्याचं रानटी कृत्य त्याकाळचे लोकं करायचे.आज स्वरुप वेगळं आहे मुलीला जन्माच्या आगोदरच आईच्या गर्भातच मारलं जातं.परंतु पैगंबरी शिकवणूकीने महिलांना कमालीचा वरचा दर्जा प्राप्त करुन दिला आहे.पैगंबरांनी सांगितलं की मातेच्या पायाखाली जन्नत स्वर्ग आहे म्हणजे आईच्या सेवेने तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल.एका दुसर्‍या हदीस मध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगीतले की आहे की जो कोणी मुलींचे संगोपन करेल,त्यांना उत्तम शिक्षण देईल आणि त्यांचे विवाह करुन देईल असा व्यक्ती अ‍ाणि मी स्वर्गात बरोबर असेल.एका लेखामध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणं माझ्या सारख्या सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीसाठी अशक्य आहे. प्रेषित मूहम्मद(स.) हे त्याच प्रकारचे पैगंबर व संदेशवाहक होते जसे विश्वाच्या प्रत्येक भागात इतर अनेक पैगंबर होऊन गेले.यांच्यापैकी काहींना आम्ही जाणतो आणि अनेकांना जाणत नाही.यापैकी एखाद्या पैगंबर वरूनही श्रद्धा ढळली तर मनुष्य मुस्लिम म्हणून राहत नाही.हे सर्व मुस्लिम धर्मीयांची मुलभूत श्रद्धा आहे.

Leave a Comment