परलोकवाद (आखेरत) (Eschatology (Islam and Afterlife))

इस्लाम धर्माच्या तीन मुळ तत्वांपैकी एक परलोकवाद म्हणजे आखेरत आहे.प्रत्येक मुसलमानाची अशी श्रद्धा आहे की हे जीवन अस्थायी आणि क्षणभंगुर आहे आणि मृत्युनंतरचे जीवन हेच कायमचे आणि स्थायी आहे आणि प्रत्येक व्यक्तिला त्याच्या निर्माणकर्त्या समोर उपस्थित रहायचे आहे. तेथे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळेल.जो ईश्वर अल्लाहला अपेक्षित असलेले व प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितल्याप्रमाणं जीवन जगेल त्याला स्वर्गप्राप्ती मिळेल आणि ज्याने ईश्वर अल्लाहच्या कृपाप्रसादांचा उपभोग घेऊन ईश्वर अल्लाहचे अस्तित्वच नाकारले किंवा ईश्वर अल्लाह सोबत इतरांची सरमिसळ केली असेल त्याला नरक यातना भोगाव्या लागतील.इस्लाम धर्मियांची श्रद्धा आहे की आपले निधन झाल्यानंतर आपल्या आत्म्याचे स्थलांतर होत असते.आपल्या पैकी प्रत्येकाने “इंतेका़ल”हा शब्द ऐकलाच असेल त्याचा अर्थ स्थलांतर किंवा ट्रान्सफर असा होतो.
प्रत्येकाचे निधन झाल्यानंतर त्याला एकतर जमिनीत पुरले जाते किंवा सरनावर ठेवले जाते किंवा विविध धर्मियांमध्ये विविध रितीने अंत्यविधी केला जातो.प्रत्यक्षात त्या व्यक्तिची शरीररुपी माती होते किंवा राख होते परंतु त्या व्यक्तिचा आत्मा बर्जख (जेथे संपूर्ण आत्मे जमा आहेत) असतो.बर्जख म्हणजे कबर आणि अंतिम प्रलायाच्या दिवस (कयामत) दरम्यानचा टप्पा आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक वचन आहे की जेंव्हा निधन झालेल्या मानसाचा दफनविधी होतो तेंव्हा देवदुत त्याला येऊन तीन प्रश्न विचारतील १) तुझा पालनहार कोण आहे? २)तुझे प्रेषित कोण आहेत? ३) तुझा जीवन व्यतीत करण्याचा मार्ग काय आहे?ज्या व्यक्तिने आयुष्य ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार व प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या मार्गानुसार व्यतीत केले असेल तोच व्यक्ती या प्रश्नांची उत्तरे देण्यात यशस्वी होईल.
जीवन जगत असतांना,कुठलही कार्य करीत असतांना आमची नजर ही मृत्युनंतरच्या जीवनावर असावी परंतु आपल्या सर्वांचं हे दुर्दैव आहे की आपण याच जीवनाला सर्वकाही समजून बसलो आहोत आणि आमचं आचरण हे दर्शवितो की आम्हाला मरायचे नाही.
प्रेषित मुहम्मद(स.)यांच्या एका हदिसनुसार माणसाचे तीन मित्र आहेत एक त्याची संपत्ती दुसरा त्याचे मुले नातेवाईक आणि तिसरे त्याचे सत्कर्म.यापैकी संपत्ती मेल्याबरोबर साथ सोडून देईल कारण त्याच्यावर आता फक्त वारसांचा हक्क राहील.दुसरा त्याची मुले नातेवाईक हे कब्रस्थानापर्यंत येतील काही दिवस अश्रु ढाळतील शोकसभा घेतील आणि तिसरा त्याने हयात असतांना केलेले सत्कर्म जे त्याच्या सोबत मरनोत्तर जीवनात कामी येतील आणि त्याला स्वर्गवासी बनवतील नरकयातनांपासून त्याचे संरक्षण करतील.
इस्लाम धर्मियांची अशी आस्था आहे की हे विश्व एक दिवस संपवण्यात येईल आणि महाप्रलयाच्या दिवशी म्हणजे कयामतच्या दिवशी न्यायनिवाडा होईल तो अत्यंत भयंकर दिवस असेल.प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला फळ मिळेल.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, मानवाचे पाय ईश्वर अल्लाह समोरुन हलणार देखील
नाहीत जोपर्यंत तो पाच प्रश्नांची उत्तरे देणार नाही.एक आयुष्य कुठे व्यतीत केले.दुसरे तारुण्य कुठे वापरले तिसरे माल कुठुन कमावला आणि कुठे खर्ची केला तसेच किती ज्ञानप्राप्त केले आणि किती त्यावर आचरण केले.
प्रेषित. मुहम्मद (स.) यांचे एक वचन आहे बुद्धिमान आहे ती व्यक्ती जी मृत्यूपूर्वी मृत्यूची तयारी करते.त्यामुळे आम्हा सर्वांचे हे कर्तव्य आहे की हिशोबाच्या दिवशी बक्षिस प्राप्त करण्यासाठी म्हणजेच स्वर्गप्रप्तीसाठी त्या दिवसावर श्रध्दा ठेवून त्याची तयारी जिवंतपणीच करावी.

Leave a Comment